शिरोळमध्ये कर्मवीर पाटील जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:13+5:302021-09-23T04:26:13+5:30
------------------- शिरोळ पालिकेची आज सभा शिरोळ : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ...

शिरोळमध्ये कर्मवीर पाटील जयंती
-------------------
शिरोळ पालिकेची आज सभा
शिरोळ : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरी कचरा संकलन, आरोग्य व करवसुलीकरिता प्रकल्प राबविणे, शहरातील वारसास्थळांची यादी तयार करणे, विविध विकासकामांचे निश्चितीकरण आदी प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.
-------------
रोटरीकडून सांस्कृतिक कार्यक्रम
शिरोळ : येथील रोटरी क्लबच्या वतीने झिम्माफुगडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मायलेकी, पारंपरिक वेशभूषा, फुगडी, उखाणे, काटवटकणा या स्पर्धा रंगतदार पार पडल्या. माजी जि. प. सदस्या इंद्रायणी पाटील, ज्योत्स्रा यादव, उज्ज्वला मिणचे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत रोटरीचे अध्यक्ष दीपक ढवळे तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.
-------------
पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी
जयसिंगपूर : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकदेखील सरसावले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका केव्हा होणार, अशी देखील संभ्रमावस्था असली तरी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका वेळेवर घ्याव्यात, अशी देखील मागणी होत आहे.