कन्नड रक्षण वेदिकेचा धुडगूस, शिवसेनेच्या वाहनावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:35+5:302021-03-13T04:46:35+5:30
शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेच्या नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे. या प्रकारानंतर संतप्त ...

कन्नड रक्षण वेदिकेचा धुडगूस, शिवसेनेच्या वाहनावर हल्ला
शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेच्या नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे. या प्रकारानंतर संतप्त शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी धर्मवीर संभाजी चौक येथे रास्ता रोको करत घटनेचा निषेध करण्यात आला. भ्याड हल्ला करणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डीसीपी विक्रम आमटेंनी मोर्चास्थळी भेट दिली. करवेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन डीसीपींनी दिले. यावेळी संबंधितांवर शिवसेनेच्या वतीने लेखी तक्रारदेखील डीसीपींना देण्यात आली. हा प्रकार वेळीच रोखण्यात आला नाही, तर पुढील वेळेस शिवसेना आणि मराठी भाषिक शांत बसणार नाहीत, हा प्रकार खपवून घेणार नाहीत. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांच्या वतीने देण्यात आला.
या मोर्चात शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना पदाधिकारी, अनेक मराठी भाषिक सहभागी होते.