शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:42 IST

वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्र

कोल्हापूर : येथील न्यू कॉलेजच्या अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. नीलेश पवार, चांदवड येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील वनस्पती शोधली असून, या नवीन प्रजातीचे सेरोपेजिया शिवरायीना असे नामकरण केले आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञाकडून घेतली जाणार आहे. अक्षय जंगम व डॉ. नीलेश पवार गेली सहा वर्षे जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली. भारतामधील कंदील पुष्प वर्गाचे तज्ज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे डॉ. शरद कांबळे, प्रा. एस. आर. यादव यांनी निरीक्षणानंतर ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब केले. या नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्येसुद्धा ही प्रजाती आढळू शकते. या संशोधनासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्रशिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्त्व जाणले. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्रेच राखीव केली. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी "गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ती झाडे वाढवावीत, तोडू न द्यावी" असे आवाहन केले होते. त्यामुळेच या कंदील पुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन