शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘कंदमुळांचा उत्सव’ येत्या गुरुवारपासून रंगणार, आहारातील वापराबाबत नेमकी माहिती मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:28 IST

प्रदर्शनात सात प्रकारच्या कंदांच्या पाककृतीबाबतची माहिती दिली जाईल

कोल्हापूर : विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी. शेतकऱ्यांनी कंदमुळांची लागवड करावी, या उद्देशाने कोल्हापुरात गुरुवारी (दि. १२), शुक्रवारी (दि. १३) कंदमुळांचा उत्सव होणार आहे. शहाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या उत्सवात विविध ६० प्रकारच्या कंदमुळांची माहिती प्रदर्शनाद्वारे दिली जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एनजीओ कम्पॅशन २४ संस्थेतर्फे श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब आदींच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला कंदमुळांचा उत्सव होणार आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते होईल. पहिल्या दिवशी रात्री आठ, तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्सव सुरू राहील. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल, अशी माहिती धोंड यांनी दिली. उत्सवातील प्रदर्शनात कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, अशा सुमारे ६० प्रकारच्या कंदांच्या जाती-प्रजातींची मांडणी असणार आहे. वीस प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे बाचूळकर यांनी सांगितले. यावेळी अमृता वासुदेवन, कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ, सुशांत टक्कळकी उपस्थित होते.जोयडा, बेल्हे येथून कंदांचे संकलनया प्रदर्शनासाठी जोयडा, बेल्हे, गगनबावडा येथून विविध कंदांचे संकलन केले आहे. प्रदर्शनात सात प्रकारच्या कंदांच्या पाककृतीबाबतची माहिती दिली जाईल. कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार असल्याचे बाचूळकर यांनी सांगितले. ‘लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स’ हे ब्रीद असलेल्या या उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धोंड यांनी केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर