वनपालपदी निवड झाल्याबद्दल कांबळेंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:32+5:302021-02-05T07:05:32+5:30

कांबळे यांची २००६ ला सरळ सेवा भरतीमध्ये वन्यजीव विभागात वनसंरक्षकपदी निवड झाली होती. त्यांनी महाबळेश्वर, भुदरगड, गडहिंगलज व राधानगरी ...

Kamble felicitated for being selected as a forester | वनपालपदी निवड झाल्याबद्दल कांबळेंचा सत्कार

वनपालपदी निवड झाल्याबद्दल कांबळेंचा सत्कार

कांबळे यांची २००६ ला सरळ सेवा भरतीमध्ये वन्यजीव विभागात वनसंरक्षकपदी निवड झाली होती. त्यांनी महाबळेश्वर, भुदरगड, गडहिंगलज व राधानगरी येथे उत्तम प्रकारे सेवा बजावल्यामुळे कोल्हापूर वनविभागाचे अधिकारी विशाल माळी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वनपालपदी नियुक्त केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला आहे.

या सत्कार समारंभ कार्यक्रमास ए. वाय. पाटील विकास सेवा संस्थेचे संस्थापक एस. डी. पौंडकर, नवभारत दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडोपंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नाथाजी पाटील, विश्वास पाटील, केरबा शेलार, मधुकर कांबळे हिंदुराव कांबळे उपस्थित होते.

Web Title: Kamble felicitated for being selected as a forester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.