शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

काळ्याकुट्ट पाण्याचा ओढा थेट मिसळतो पंचगंगेत अंगावर शहारे : दुर्गंधीयुक्त पाण्याने केली नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजी शहरांतून वाहत पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन वाहणारा ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इचलकरंजी शहरांतून वाहत पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन वाहणारा काळा ओढा आजही पंचगंगा नदीत दिवसरात्र मिसळत आहे. जे पाणी पाहूनच अंगावर शहारे येतात असे पाणी नदीत मिसळताना पाहून नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत इचलकरंजी नगरपालिकेसह विविध यंत्रणा किती बेफिकीर आहेत याचेच प्रत्यंतर गुरुवारी आले. मुख्यमंत्री आदेश देवोत की पंतप्रधान, प्रदूषण नियंत्रण मंडळासह कुणालाच त्याचे कांही वाटत नाही इतकी गेंड्याच्या कातडीची ही यंत्रणा बनली आहे. तक्रारी झाल्या, आंदोलने झाली की अधिकाऱ्यांचे हप्ते वाढतात. प्रदूषण कांही थांबत नाही असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रदूषणप्रश्नी मंत्रालयात बैठक घेतल्यावर यंत्रणा जरूर हलली. त्यांनी ओढ्यात मातीची पोती भरून तात्पुरते दोन-तीन बंधारे केले. त्यातून पाणी अडविले, परंतु ते रोखलेले नाही. पाण्याचा लोट आजही नदीत मिसळत आहे. हा ओढा सुरू कुठे होतो व तो पंचगंगा नदीत नक्की कुठे मिसळतो हे लोकमतच्या प्रतिनिधिनी गुरुवारी दुपारी शेतवडीतून जाऊन पाहिले. खरा तर हा ओढा नाहीच तो काळ्या नदीसारखाच आहे. पंचगंगा दुतर्फा भरून वाहत आहे आणि तो टाकवडे वेसपासून पूर्वेला वाहत जाऊन नदीत मिसळत आहे. जिथे मिसळतो तिथे प्लॅस्टिकचा कचऱ्याचा ढीग साचला होता. नदीचे निम्मे पात्र अक्षरक्ष: गटारीसारखे काळे झाले आहे. पाण्यातून घाण उमाळे येत होते. हे सारे संतापजनकच आहे. हेच पाणी पोटात घेऊन पंचगंगा बिचारी उत्तरेकडे वाहत जाते. प्रदूषणामुळे मासे मरतात, माणसे मरतात. त्याचे पंचनामे होतात, परंतु प्रदूषण रोखण्याच्या दीर्घकालीन उपाययोजना यशस्वी झालेल्या नाहीत हे कटू सत्य आहे.

प्रतीकांचीच पूजा..

नदीला आपण आई मानतो. ती ओलांडतानाही आवर्जून हात जोडले जातात. परंतु तिचे प्रदूषण रोखण्याबद्दल मात्र कमालीचे बेफिकीर असल्याचे चित्र सार्वत्रिक दिसते. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी संगम ते उगम अशी परक्रिमा घडवून आणली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी नमामि पंचगंगा उपक्रम हाती घेतला. खासदार धैर्यशील माने यांनीही असेच काही उपक्रम हाती घेतले, परंतु या सर्वांचेच पुढे काय झाले हे कुणालाच समजले नाही. त्यातून प्रदूषण काय रोखले नाही. ते रोखण्यापेक्षा असल्या प्रतीकात्मक कार्यक्रमातच लोकप्रतिनिधींना जास्त रस असल्याचे चित्र दिसते..

रामदासभाईंची गर्जना..

भाजप-शिवसेनेचे सरकार असताना पर्यावरणमंत्री असलेल्या रामदास कदम यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नी कोल्हापुरात शासकीय विश्रामधामवर बैठक घेतली. प्रदूषण रोखले नाही तर कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. परंतु त्यानंतर प्रदूषण करण्यात ज्यांचा वाटा आहे अशा मंडळींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटून आले. त्यानंतर ते हे गुन्हे दाखल करण्याचेच विसरून गेले.

आदेशाचा फायदा असाही..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली आणि प्रदूषणास कारणीभूत असलेल्या उद्योगांना टाळे ठोका, असे आदेश दिले. असे आदेश आले की प्रदूषण रोखणारी यंत्रणा अधिक अलर्ट होते. प्रदूषण रोखल्याचे कागदोपत्री कांही घोडे नाचवले जातात, आराखडे तयार होतात परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी फारच कमी होते व आदेशाची भीती दाखवून पाकिटाचे वजन मात्र वाढते असाच आजपर्यंतचा अनुभव असल्याचे प्रदूषणमुक्तीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अक्षम्य दुर्लक्ष

मागील सरकारच्या काळात पंचगंगा प्रदूषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबरदस्त राजकीय ताकद होती. त्यांनी मनांत आणले असते तर नवीन नदी ते तयार करू शकले असते, परंतु पंचगंगेचे प्रदूषणप्रश्नी त्यांनी साधी बैठकही कधी घेतली नसल्याचे वास्तव आहे.

२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०१ व ०२

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास सर्वांत जास्त जबाबदार असणारा इचलकरंजीतील हाच तो काळा ओढा..तो टाकवडेवेसपासून दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटरवर पंचगंगा नदीत मिसळतो व नदीचे गटार करतो. गुरुवारी दुपारी काळेकुट्ट पाण्याचा लोट नदीत मिसळत होता. (छाया : उत्तम पाटील)

२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०३

पंचगंगा नदीच्या उत्तरेकडून वाहत येणारा हाच तो काळा ओढा..जिथे नदीत मिसळतो तिथे कचऱ्याचा असा ढीग पाण्यावर तरंगत असून, पाण्यावर तवंग आला आहे (छाया : उत्तम पाटील)