शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवरायांच्या पुतळ्यासाठी कळविकट्टी-मनगुत्ती दांडी मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 13:12 IST

बेळगाव जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा दिलेला शब्द पाळून तातडीने पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसविला जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

ठळक मुद्देशिवरायांच्या पुतळ्यासाठी कळविकट्टी-मनगुत्ती दांडी मार्चअन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसवू, शिवसेनेचा इशारा

गडहिंग्लज : बेळगाव जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा दिलेला शब्द पाळून तातडीने पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसविला जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गावातील एका गटाच्या विरोधामुळे पंधरा दिवसापूर्वी चबुतऱ्यावरून उतरविण्यात आला. त्यामुळे चबुतऱ्याच्या जागेवर धरणे आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला होता.

त्यावेळी बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रेड्डी यांच्या उपस्थितीत मनगुत्तीमध्ये झालेल्या बैठकीत १५ दिवसात पुन्हा पुतळा बसविला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, पुतळा न बसविल्यामुळे शिवसैनिकांनी कळविकट्टी ते मनगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढला.कर्नाटक पोलिसांनी मनगुत्ती गावच्या वेशीवरच मोर्चा अडवला. त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, संघटक संग्राम कुपेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांची भाषणे झाली. हुक्केरीचे तहसिलदार अशोक गुराणी व मंडल पोलिस निरीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, राजेंद्र पाटील, भरत जाधव, प्रतीक क्षीरसागर, मंजित माने, भिकाजी हळदकर, उत्तम पाटील, दिनेश कुंभीरकर आदींसह सीमाभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संयुक्त बैठक बोलवाशिवरायांचा पुतळा पुर्नप्रतिष्ठानेसाठी कर्नाटक-महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, सीमाभागातील खासदार, बेळगाव व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि मनगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनहट्टी या गावातील लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.गनिमी काव्यानेच धडकआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी, निपाणी, संकेश्वरसह मनगुत्तीकडे जाणाऱ्या सीमाभागातील रस्त्यावर कर्नाटक पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. त्यामुळे कोल्हापूरहून आलेल्या शिवसैनिकांनी कागल-निढोरी मार्गे गडहिंग्लजला येवून तेरणी-कळविकट्टी मार्गे महाराष्ट्राच्या हद्दीतूनच मनगुत्तीपर्यंत धडक मारली. मनगुत्ती गावात येणाऱ्या सर्व मार्गांसह संपूर्ण गावात कर्नाटक पोलिसांचा तर कळविकट्टी येथे महाराष्ट्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पुतळ्याचा प्रस्तावच नाहीशिवरायांचा पुतळा उतरवल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर मनगुत्ती येथील शिवाजी चौकातील त्या जागेवर म. बसेवश्र्वर, छ. शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, वाल्मिकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. परंतु, त्यासंदर्भातील प्रस्ताव बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे अद्याप न गेल्यामुळेच पुतळ्यासंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे तहसिलदारांनी यावेळी आंदोलकांना सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर