शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम दीड महिन्यात; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:42 IST

पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता, तीन टप्प्यांत होणार काम

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, कागलसह कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या गळती दुरुस्तीच्या कामाला येत्या दीड महिन्यात सुरुवात होणार आहे. या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून, ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १२१ गावांमधील ४१ हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी धरणाला गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याविरोधात सर्वच स्तरातून आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये धरणाच्या गळती दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, गत सहा महिन्यांपासून यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता.धरणातील सगळा पाणीसाठा संपल्यावर प्रशासन गळती काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात असल्याने पाटबंधारे विभागाला जाग आली असून, या दुरुस्तीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या २७ ऑगस्टपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल. या गळती दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता

  • दूधगंगा प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा २५ टीएमसीचा प्रकल्प आहे. या धरणावर जिल्ह्यातील तीन तालुक्यांसह बेळगाव जिल्ह्यातीलही शेती सिंचनाखाली आहे. शिवाय कोल्हापूर शहरासह अनेक छोट्या शहरांचा पाणीपुरवठा याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून या धरणाला मोठी गळती असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळतीमुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे गळती काढण्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार आवाज उठविला होता.
  • सध्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन टप्प्यांत हे काम हाती घेण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतचगतवर्षी १५ ऑगस्टला कोल्हापुरात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळा संपल्यानंतर धरणाची गळती काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता दुसरा पावसाळा संपत आला तरी या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली, तरी ज्या ठेकेदाराला हे काम मिळेल त्याच्याकडून तरी ते वेळेत पूर्ण केले जाईल का, याबाबतही सांशकता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीच याबाबत दबावगट तयार करून हे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.

दूधगंगा प्रकल्पाच्या गळती दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत हे दुुरुस्तीचे काम करण्यात येईल. - ए. एस. पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण