शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:08 IST

निविदेच्या टप्यातच शासनाकडून दिरंगाई

कोल्हापूर : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातील गळती काढण्याची निविदा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी येत्या पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे पाटबंधारे प्रशासनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.राधानगरी तालुक्यात असणाऱ्या काळम्मावाडी धरणात २५.४० टीएमसी पाणीसाठा करता येतो. मात्र, दगड-मातीच्या असणाऱ्या या धरणाच्या पायामध्येही प्रचंड गळती आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकत नाही. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ८० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. धरणावर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण जिल्ह्यातील समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या कामाला निधी मिळवण्यासाठी शासकीय पातळीवर वजन वापरले. मात्र, निविदा निश्वित होऊन वर्कऑर्डर मिळण्याच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव शासकीय पातळीवर लालफितीत अडकला. परिणामी तातडीने काम सुरू होणार नाही. आता लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. वर्कऑर्डर मिळाले तरी आचारसंहिता संपेपर्यंत गळतीच्या कामाचा प्रारंभ होणार नाही. ही सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत जून महिना उजाडणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर गळतीचे काम करणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण