शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यातही कोल्हापुरातील कळंबा तलाव कोरडाच, अद्यापही पाणीपातळी चार फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:06 IST

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने ...

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने दडी मारून बरीच हुलकावणी दिल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. आजमितीला पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली असून, तलावपात्राचा वापर विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होत आहे.पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. तलावपात्रात निव्वळ डेड अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक असून, जलचरांच्या अस्तित्वासाठी ताे शिल्लक ठेवणे क्रमप्राप्त असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे करण्यात येणारा पाणी उपसा बंद केला आहे. कळंबा ग्रामपंचायती मार्फत होणारा एक एमएलडी पाणी उपसा बंद केला असून गावातील सार्वजनिक विहिरी बोअरवेलमधून पाणी उपसा करून गावची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे.गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने एका आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यावेळी ग्रामस्थ तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावाचे मुख्य जलस्राेत असणारे सात नैसर्गिक नाले तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामात गडप केले असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. संबंधित प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची गरज निर्माण झाली आहे. -पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस