किटवाडच्या अनाथ मुलांना कालकुंद्री ग्रामस्थांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:33+5:302020-12-30T04:31:33+5:30
कालकुंद्री गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन करताच गावासह देश-विदेशात राहणारे ग्रामस्थ आर्थिक मदतीसाठी सरसावले. गावातून ९० हजार, तर ...

किटवाडच्या अनाथ मुलांना कालकुंद्री ग्रामस्थांची मदत
कालकुंद्री गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन करताच गावासह देश-विदेशात राहणारे ग्रामस्थ आर्थिक मदतीसाठी सरसावले. गावातून ९० हजार, तर ग्रामस्थ मंडळ मुंबईचे पदाधिकारी रामराव पाटील, श्रीकांत द. पाटील, पांडुरंग कोकितकर आदींच्या प्रयत्नातून १ लाख ५५ हजार रुपये असा एकूण अडीच लाखांचा निधी जमा झाला आहे.
काही ग्रामस्थांनी थेट वैयक्तिक निधी दिला. ही रक्कम नुकतीच किटवाड येथे जाऊन ग्रामस्थ मंडळ मुंबईचे पदाधिकारी गावातून निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेले गजाभाऊ पाटील, के. जे. पाटील, सुरेश नाईक, पांडुरंग गायकवाड, रामचंद्र खवणेवाडकर, सुभाष पाटील व गावातील शिक्षक आदींच्या उपस्थितीत ठेवपावत्यांच्या स्वरूपात मुले व आजी यांच्या हाती मदत सुपूर्द केली.
यावेळी किटवाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणालची दहावी व त्यापुढील शिक्षणाचीही जबाबदारी किणी येथील जयप्रकाश विद्यालयाने स्वीकारली आहे.
------------------------
* फोटो ओळी :
किटवाड (ता. चंदगड) येथील कुणाल व काजल ही अनाथ मुले व आजीकडे ठेवपावत्या देताना कालकुंद्री ग्रामस्थ व मुंबई ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी.
क्रमांक : २८१२२०२०-गड-०१