काका पाटील स्पोर्टस् , कोकरूड, सनी विजयी

By Admin | Updated: March 25, 2017 00:09 IST2017-03-25T00:09:38+5:302017-03-25T00:09:38+5:30

उत्तरादाखल खेळताना तडाखा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ८ षटकांत ७ बाद ५१ धावांपर्यंतच मजल मारता आली

Kaka Patil Sports, Kokarud, Sunny Won | काका पाटील स्पोर्टस् , कोकरूड, सनी विजयी

काका पाटील स्पोर्टस् , कोकरूड, सनी विजयी

कोल्हापूर : शास्त्रीनगर मैदान येथे जय शिवराज मित्रमंडळाच्यावतीने आयोजित ‘कै. अण्णा मोगणे चषक २०१७’ या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कोकरूड स्पोर्टस्, सनी स्पोर्टस् व काका पाटील स्पोर्टस् या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवत आगेकूच केली. शुक्रवारी झालेल्या सकाळच्या सत्रातील पहिला सामना कोकरूड स्पोर्टस् विरुद्ध गांधी मैदान स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना गांधी मैदान स्पोर्टस्ने ६ षटकांत ५ बाद ५९ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना कोकरूड संघाने ६ षटकांत ४ बाद ६० धावा करत विजय संपादन केला. त्यात ‘सामनावीर’ म्हणून अमित पाटील यास गौरविण्यात आले.
दुसरा सामना सनी स्पोर्टस् (नागाव) व संजय इलेव्हन (जयसिंगपूर) यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना सनी स्पोर्टस्ने ७ षटकांत ४ बाद ८७ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना संजय इलेव्हनला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ ६६ धावांत गुंडाळला. त्यामुळे हा सामना सनी स्पोर्टस्ने १६ धावांनी जिंकला. त्यात ‘सामनावीर’ म्हणून सचिन माळी यास गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात काका पाटील स्पोर्टस् विरुद्ध तडाखा स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना पाटील स्पोर्टस्ने ८ षटकांत ६ बाद ८० धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना तडाखा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ८ षटकांत ७ बाद ५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामना पाटील स्पोर्टस्ने जिंकला. ‘सामनावीर’ म्हणून अमर ढोकरे यास गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Kaka Patil Sports, Kokarud, Sunny Won