‘काका-बाबां’नी केला हिशेब चुकता!

By Admin | Updated: August 31, 2015 23:25 IST2015-08-31T23:25:03+5:302015-08-31T23:25:03+5:30

कऱ्हाड बाजार समितीत सत्तांतर : उंडाळकर-भोसले गटाला १६, आमदार गटाला २ जागा

'Kaka-Baban' made a reckoning! | ‘काका-बाबां’नी केला हिशेब चुकता!

‘काका-बाबां’नी केला हिशेब चुकता!

कऱ्हाड : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, डॉ. सुरेश भोसले यांच्या रयत सहकार पॅनेलने १६ जागा मिळवत आमदार बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव केला. ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांवरच महाआघाडीला समाधान मानावे लागले. विलासकाका उंडाळकर व अतुल भोसले यांच्या आघाडीने विधानसभेतील पराभवाचा हिशेब चुकता केला. येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी अत्यंत चुरशीने ९८.६२ टक्के मतदान झाले होते. गेला महिनाभर दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांसह नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. त्यामुळे निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. मतमोजणी चार तासांत पूर्ण करण्यात आली. सुरुवातीला हमाल, मापाडी गटांतील मतांची मोजणी करण्यात आली. (पान ६ वर)

Web Title: 'Kaka-Baban' made a reckoning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.