शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’बदली समरजितना मंत्रिपद, पवारांचा शब्द; जयंत पाटील यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:37 IST

कागलमध्ये गद्दार मुश्रीफ यांना पाडण्याचे केले आवाहन

कागल : ‘कागलकरांनो, गद्दार हसन मुश्रीफ यांना पाडा. मंत्रिपदाची चिंता करू नका, कागलला ‘त्यांच्या’बदली समरजित यांना मंत्रिपद देण्याचा शरद पवार यांनी शब्द दिला आहे, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.येथे समरजित घाटगे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, कागलमध्ये परिवर्तनाचा मोठा अंडरकरंट दिसत आहे. ८४ वर्षांच्या योद्ध्याने मंडलिक यांचा रोष पत्करून मुश्रीफ यांना सर्व काही देऊनही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मुश्रीफ यांनी केले, म्हणून पवार यांच्याशी गद्दारी केलेल्या मुश्रीफ यांना पाडलेच पाहिजे.समरजित म्हणाले, विरोधक इतके घाबरले की शेवटची सभा आम्ही गैबी चौकात जाहीर केली होती. तो चौक त्यांनी आधीच बुक केला. मुश्रीफ यांच्याकडून कुठं भंडाऱ्याची शपथ, कुठं लिंबू, मिरची टाक असे भानामतीचे प्रकार सुरू आहेत. त्यापुढे श्रीरामांचे मंदिर असलेल्या खर्डेकर चौकाला ते अशुभ मानतात. याचा कागलकरांनी विचार करावा. जनता दलाच्या स्वाती कोरी म्हणाल्या, ‘तुम्हाला ईडीची नोटीस आली की नाही? तुरुंगवास होणार होता की नाही? पक्ष फोडला की नाही? पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही? या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मत मागा.’यावेळी प्रवीणराजे घाटगे, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, नवोदिता घाटगे, नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, श्रेयादेवी घाटगे, ॲड. दिग्विजय कुऱ्हाडे, संभाजी भोकरे, सागर कोंडेकर, शिवानंद माळी, अभिषेक शिंपी उपस्थित होते. मुश्रीफ गाडले जाणार..सरोज पाटील म्हणाल्या, जी मंडळी पवार यांना सोडून गेली, तेथील सभा विक्रमी गर्दीत पार पडत आहेत. त्यामुळे कागलमध्येही मुश्रीफ गाडले जाणार हे निश्चित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलJayant Patilजयंत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेSharad Pawarशरद पवारbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024