कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथे सोमय्याचा पुतळा दहन करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, प्रवीण काळबर, सुनील माळी, नितीन दिंडे, संजय चितारी, अमित पिष्टे, सौरभ पाटील, सुरेश शिंदे, पंकज खलीफ, बच्चन कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले. तर घरकूल प्रकल्प येथे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सागर दावणे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करनुर, वंदुर , लिंगणुर दुमाला, या गावात तसेच कागल शहरात सोमय्यांच्या निषेधाचे फलक लावले आहेत.
कागलची जनता सहन करणार नाही
कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी यांनी किरीट सोमय्या यांचा निषेध केला आहे. मंत्री मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करून बदनामी केली आहे. मंत्री मुश्रीफांचे गोरगरिबांच्यासाठीचे काम सहन न झाल्याने भाजपाकडून हे आरोप सुरू आहेत. मात्र असे आरोप कागलची जनता सहन करणार नाही, असे म्हटले आहे.
फोटो कॅप्शन
कागल येथे घरकूल प्रकल्पातील नागरिकांनी किरीट सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोपांचा निषेध केला.