शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kagal Satara Highway : कागल-सातारा महामार्गावरील टोलची मुदत संपली, तरीही वसुली‌ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:44 IST

सतीश पाटील शिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ ...

सतीश पाटीलशिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ दिवस रस्ते विकास महामंडळाकडे पथकर वसुली‌ आहे तशीच सुरू राहणार आहे.सन २००२ मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कागल‌-सातारा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या महामार्गाची पथकर वसुलीची मुदत २० वर्षांची होती. कागल-सातारा चौपदरीकरणाची मे महिन्यात मुदत संपली आहे. पण गेल्या वीस वर्षांत नोटबंदी, कोरोना लॉकडाऊन काळात ५३ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाला ५३ दिवस पथकर वसुलीसाठी मुदत वाढवून मिळाली आहे.२५ जून २०२२ पर्यंत पथकर वसुली रस्ते विकास महामंडळ करणार आहे.२५ जून नंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे.कागल सातारा सहा पदरीकरणाची निविदा निघेल अशी अपेक्षा होती. पण तांत्रिक त्रुटी मुळे निवीदाच निघालेल्या नाहीत त्यामुळे सहापदरीकरण सुरू होवू शकलेले नाही. आणि चौपदरीकरणाची मुदत संपली आहे. त्यामुळे वाहनधारक  पथकर का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत आहेत.मार्गाच्या सहापदरीकरणाची निविदा मे महिन्यापर्यंत निघाली नाहीतर या मार्गावरील पथकरात सवलत मिळेल अशी अपेक्षित होते. पण तसे न होता ५३ दिवस पथकर वसुलीची मुदत वाढवून दिली आहे.

कागल-सातारा महामार्गाच्या पथकर वसुलीसाठी ५३ दिवस मुदत वाढ रस्ते विकास महामंडळाला मिळाली आहे.यानंतर हा महामार्ग  रस्ते विकास महामंडळाकडून  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होईल. -वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग -प्रकल्प व्यवस्थापक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका