कागल पोलिसांची गणेश मंडळावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:08+5:302021-09-18T04:27:08+5:30
कागल : परवानगी नसताना डाॅल्बी साऊंड लावून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्याबद्दल कागल पोलिसांनी सुळकुड येथील शिवतेज तरुण मंडळांच्या ...

कागल पोलिसांची गणेश मंडळावर कारवाई
कागल : परवानगी नसताना डाॅल्बी साऊंड लावून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्याबद्दल कागल पोलिसांनी सुळकुड येथील शिवतेज तरुण मंडळांच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच तीन ट्रॅक्टर ट्राॅली, जनरेटर, डाॅल्बी साऊंड सिस्टीम, लाईटिंग सिस्टीम, मोबाइल हॅण्डसेट असे २६ लाख ६० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
बंडा परीट, सत्यम पाटील, राहुल चवई, दादासो परीट, रामचंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ट्रॅक्टर मालक पार्वते यांच्यासह अडीचशे जणांच्या जमावावर कोरोना प्रतिबंधक उपाय कायदा आणि साथीचे रोग व आपत्ती निवारण कायद्याचा भंग, ध्वनिप्रदूषण नियमाचा भंग करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. या मंडळाने गुरुवार १६ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता झेंडा चौक ते दूधगंगा नदी अशी गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली होती. कागल पोलिसांना ही बातमी समजताच तत्काळ कारवाई करण्यात आली.