शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलला सीमा तपासणी नाका सुरू, अदानी समूहातील कंपनीचे व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:46 IST

सोयीसुविधांची वानवा 

कागल : येथील महामार्गावर निर्माण केलेला खासगी तत्त्वावरील एकात्मिक सीमा तपासणी नाका मंगळवारी सकाळी सुरू झाला. विविध घटकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहने या नाक्यावर वळविण्यात आली. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्या व कर्नाटकातून येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांची तपासणी होणार आहे.महामार्गावर बॅरिकेड लावून महामार्ग बंद केल्यानंतर ही वाहने दहा लेनच्या तपासणी नाक्याकडे वळविली. मंगळवारी पहिला दिवस असल्याने येथील कर्मचारी, अधिकारी तसेच वाहनचालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. दुचाकी वाहनधारकांना नेमक्या कोणत्या लेनमधून जायचे याचा उलगडा होत नव्हता. पहिल्या दिवशी विविध तपासण्यांमध्ये सूट दिल्याचे चित्र दिसत होते. खासगी प्रवासी वाहनांनाही या नाक्यावरून जावे लागल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसत होती. या ठिकाणी फक्त आरटीओशी संबंधित कागदपत्रांची तपासणी होत होती. काही दिवसांनंतर जीएसटी व अबकारी खात्याचीही कागदपत्रे येथे तपासली जाणार आहेत.असे चालणार कामकाज 

  • अदानी उद्योग समूहातील महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेडमार्फत हा नाका चालविण्यात येत असून येथे कंपनीचे कर्मचारी संगणकीकृत नाक्यावर वाहनांचे वजन व अन्य कागदपत्रांची तपासणी करतील. त्यामध्ये त्रुटी आढळलेली वाहने येथे उपस्थित असणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याकडे पाठविली जातील व ते नियमानुसार पुढील कारवाई करतील, अशी कामकाज रचना आहे.
  • ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत व त्रुटी नाहीत ती मालवाहतूक वाहने येथून सरळ पुढे जातील.
  •  हलके वजन असणाऱ्या मालवाहतूक वाहनांना प्रत्येकी ५३ रुपये, मध्यम वाहनांना ११२ रुपये, तर जड व अतिजड वाहनांना २१८ रुपये सेवा कर आकारला जाणार आहे.
  • मोकळ्या वाहनांना तसेच मालवाहतूक सोडून अन्य वाहनांना कोणता सेवा कर आकारण्यात येणार नाही.

सोयीसुविधांची वानवा या ठिकाणी थांबणाऱ्या वाहनांना तसेच चालकांना वेगवेगळ्या सेवासुविधा देण्यासाठी दुकानगाळ्यांची निर्मिती केली आहे. पण ते सुरू केले नव्हते. गाळेधारकांना वीज आणि पाणी दिलेली नाही. गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAdaniअदानी