भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त

By Admin | Updated: October 10, 2014 00:14 IST2014-10-10T00:13:10+5:302014-10-10T00:14:27+5:30

विधानसभा : दानेवाडीजवळ दोन लाखांच्या रकमेसह एकाचे पलायन

Kagal, Bhogavanti Nau Million seized in the action of the squad of pilgrims | भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त

भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने कागल, भोगावती येथे केलेल्या तपासणीत नऊ लाख रुपयांसह १२ किलो चांदी जप्त केली, तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीजवळ भरारी पथकाने चारचाकी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत दोन लाख तीस हजारांची रक्कम आढळली. मात्र, कागदपत्रे मागताच वाहनचालकाने पलायन केले. पथकाने त्याचा पाठलाग करूनही तो सापडला नाही.
मतांसाठी मोठ्या प्रमाणात होणारा पैशांचा वापर लक्षात घेऊन निवडणूक विभागाने आचारसंहिता कडक केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात तपासणी नाके उभारले आहेत. आज, गुरुवारी येथील राष्ट्रीय महामार्गावर आयबीपी पेट्रोल पंपासमोर सुरू असलेल्या तपासणी केंद्रावर कर्नाटक एस.टी. बसमधून १२ किलो चांदी आणि रोख आठ लाख रुपये पकडण्यात आले. कोल्हापूर येथील प्रतिभानगरमधील चांदी व्यापारी गेनमल हिराचंद जैन यांची ही रक्कम आहे. त्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध नाही. मात्र, तरीही तपासासाठी ही चांदी आणि रोख रक्कम कागल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, राधानगरी-करवीर तालुक्याच्या सीमेवर भरारी पथकाच्या हाती चारचाकी गाडीत एक लाख दोन हजारांची रोकड सापडली. ही रक्कम वाईन शॉप मालकाची असल्यामुळे वेगवेगळे तर्कविर्तक लढविले जात आहेत. सायंकाळी मारुती गाडीत (एमएच १५ डी २३५८) एक लाख दोन हजारांची रोकड सापडली. गाडी किशोर चंदवानी यांच्या मालकीची असून, सापडलेल्या रकमेपैकी संबंधिताने ४० हजारांचा हिशेब दिलेला आहे. उर्वरित रकमेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यावरून गाडी व चालक यांना करवीर पोलिसांच्यावतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Kagal, Bhogavanti Nau Million seized in the action of the squad of pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.