कागल येथे ५४ महिला कोरोना रुग्णाना हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:32+5:302021-07-24T04:16:32+5:30
कागल : येथील वाहन तपासणी नाक्याच्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गोडावून क्रमांक एकजवळ दूधगंगा नदीचे पाणी आल्याने ...

कागल येथे ५४ महिला कोरोना रुग्णाना हलविले
कागल : येथील वाहन तपासणी नाक्याच्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गोडावून क्रमांक एकजवळ दूधगंगा नदीचे पाणी आल्याने सकाळी सात वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धाव घेऊन गाफिलपणाबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. तेथून तातडीने सर्व रुग्णांना दुसरीकडे हलविण्याचे काम सुरू झाले. एकूण ५४ महिला कोरोना रुग्ण होत्या.
गतवेळच्या महापुरातही येथे पाणी आले होते.असे असूनही प्रशासनाने येथुन रुग्ण हलविण्याचे नियोजन केले नव्हते. सकाळी ही बाब मंत्री मुश्रीफ यांच्या लक्षात आली. कोविड रुग्णांच्यासाठी असलेले साहित्य एका खोलीत ठेवले होते. त्या खोलीभोवती पाणी आले होते. मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष घातले नसते तर हे सर्व साहित्य पाण्यात बुडाले असते. येथील रुग्णांनीही अंघोळीसाठी गरम पाणी दिले नाही, अशी तक्रार केली. मंत्री मुश्रीफ यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. तालुक्यातील अन्य कोविड सेंटरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विविध गांवाना भेटी देऊन महापुराची पाहणी केली
चौकट
पूरग्रस्तांच्या स्थलांतरित कोरोनाची अडचण.
एकीकडे महापुराचा तडाखा बसत असताना कोरोना रुग्णांच्या संकटात दुहेरी भर पडत आहे. कोविड सेंटरमध्ये पावसाचे पाणी येण्याबरोबरच रस्ते बंद झाल्याने औषधे व इतर सेवासुविधा ही वेळेवर पोहोचविण्यात अडचणी आल्या आहेत. तर स्थलांतरित कुटुंबांना निवारा देतांना कोरोना संसर्गाचाही विचार केला जात असल्याने सरकारी शाळा व इमारतीतच आसरा घ्यावा लागत आहे.
फोटो
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भरपावसात तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. करनूर येथील भेटी वेळी पूर परिस्थितीचा आढावा घेतला.