शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

६६६६..; के. चंद्रशेखर राव यांच्या ताफ्यात एकसारख्या क्रमाकांच्या २० गाड्या, कोल्हापुरात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:54 IST

पोलिसही चक्रावले. फॅन्सी नंबरचे वेड असणाऱ्या कोल्हापूरकरांना मुख्यमंत्री राव यांच्या याच वेडाचे अप्रूप वाटले

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्या गाड्यांच्या एकसारख्या क्रमाकांचीच चर्चा जास्त रंगली. या क्रमांकातील ६ हा अंक राव यांच्यासाठी लकी असून त्यामुळेच त्यांनी ६६६६ असा क्रमांक घेतल्याचे सांगण्यात आले. फॅन्सी नंबरचे वेड कोल्हापूरला अगोदरपासूनच आहे. फॅन्सी नंबरसह आपल्या आवडत्या नेत्याच्या गाडीचा क्रमांक कोल्हापूरकर वर्षाला काही कोटी रुपये भरून मिळवतात. त्यामुळे मुख्यमंत्री राव यांच्या याच वेडाचे कोल्हापूरला अप्रूप वाटले.याआधीही राव हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येताना सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन आले होते. राव यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी हैदराबादहून एकूण २४ गाड्या आणि ५० सुरक्षारक्षक सोमवारीच कोल्हापुरात आले होते आणि एका धर्मशाळेत थांबले होते. सकाळी राव हे विमानतळावर येण्याआधी यातील २० गाड्या एका रांगेने विमानतळावर आणून उभ्या करण्यात आल्या. मात्र या सर्व गाड्यांचा टीएस ०९ के ६६६६ हा एकच क्रमांक असल्याने पोलिसही चक्रावले.कोणत्या गाडीला नेमके संरक्षण द्यायचे हे पोलिसांनाही कळेना; परंतु राव आले आणि आपल्या सहकाऱ्यांसह ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसले. या सर्वांसाठी ही व्हॅनिटी व्हॅन तयार ठेवण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या कार्यालयासह, भाेजन व्यवस्था, स्वच्छतागृहाचीही सोय आहे.केवळ सुरक्षेसाठीअशा पद्धतीने वीस गाड्यांना एकच क्रमांक देता येतात का, अशी चर्चा या निमित्तााने रंगू लागली; परंतु सुरक्षेच्या कारणावरून अशा पद्धतीने एकच क्रमांक देणे कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांसह हैदराबादहून आणलेल्या २४ गाड्यांचा समावेश होता. यामध्ये मोबाइल जॅमर वाहन होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव