जोतिबा - वैराग एसटीमुळे भाविकांची सोय
By Admin | Updated: May 6, 2014 18:25 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T18:25:59+5:30
जोतिबा : जोतिबा ते वैराग (जि. सोलापूर) एस.टी. सुरू झाल्यामुळे माढा, शेटफळ, पंढरपूर, सांगोला परिसरातील प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बार्शी एस. टी. आगाराने ही एस. टी. सुरू केली आहे.

जोतिबा - वैराग एसटीमुळे भाविकांची सोय
ज तिबा : जोतिबा ते वैराग (जि. सोलापूर) एस.टी. सुरू झाल्यामुळे माढा, शेटफळ, पंढरपूर, सांगोला परिसरातील प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बार्शी एस. टी. आगाराने ही एस. टी. सुरू केली आहे.श्री क्षेत्र जोतिबा डोंगरला सोलापूर जिल्ातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी बार्शी एस.टी. आगाराने वैराग ते जोतिबा ही मुक्कामी एस.टी. बस नुकतीच सुरू केली आहे. वैराग (जि. सोलापूर) येथून दुपारी १ वाजता ही बस सुटते. माढा, शेटफळ, पंढरपूर, सांगोला, सांगली, कोल्हापूर मार्गे जोतिबा असा प्रवास करीत ही बस रात्री ८ वाजता मुक्कामी जोतिबा डोंगरावर पोहोचते. सकाळी दुसर्या दिवशी ही बस ८ वाजता जोतिबा बसस्थानकावरून निघते. दुपारी ३ वाजता वैराग या ठिकाणी ही बस पोहोचते. या मुक्कामी बस सेवेमुळे जोतिबा डोंगर परिसरातील प्रवाशांची सोय झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वार्ताहर