शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘चांगभलं’चा गजर, जोतिबावरील खेट्यांची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:01 IST

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात रविवारी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात जोतिबाच्या खेटा यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते ...

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात रविवारी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात जोतिबाच्या खेटा यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. आज सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी श्री जोतिबाचे गुलाल-खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतले. रविवारी जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या खेटे यात्रेचा रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. कोल्हापूर शहरासोबत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील अनेक भाविकही मोठ्या श्रद्धेने खेट्यासाठी सहभागी झाले होते. रविवारी शेवटचा खेटा असल्याने भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होती. यावेळी हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते.‘चांगभलं’च्या गजराने डोंगरघाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी ८ ते ९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी गावकरी सहभागी झाले होते. दुपारी ३ ते ४ अभिषेक, रात्री पालखी सोहळ्याने खेट्याची सांगता झाली. चौथ्या खेट्यानिमित्त श्री जोतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. शेवटच्या खेट्यानिमित्त जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भाविकांना लस्सीचे वाटप केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा