जोतिबा- केर्ली मार्ग खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:56+5:302021-06-18T04:16:56+5:30
जोतिबा केर्ली मार्ग २०१९ च्या पावसाळ्यात २५० मीटर अंतरचा तुटला होता. २०२० मध्ये नवीन दुरुस्त केलेला नवीन रस्ताही दुसऱ्यांदा ...

जोतिबा- केर्ली मार्ग खचला
जोतिबा केर्ली मार्ग २०१९ च्या पावसाळ्यात २५० मीटर अंतरचा तुटला होता. २०२० मध्ये नवीन दुरुस्त केलेला नवीन रस्ताही दुसऱ्यांदा खचला होता. खचलेला रस्ताच्या कामासाठी दोन कोटी खर्च झाला होता. हा रस्ता अगदी नेटका, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आला होता. मात्र २०२१ मध्ये पहिल्याच पावसात गतवर्षी खचलेल्या रस्त्यापासून ३ किमी अंतरावरील जॅकवेल परिसरातील धोकादायक वळणावरील रस्ता खचला आहे. गेल्या वर्षी पाण्याचा टाका परिसरातील रस्ता तुटलेला होता. परिणामी जोतिबा डोंगराला जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे गायमुख तलाव मार्गावरील नागमोडी रस्त्याने सुरू केली होती. गतवर्षी पावसाळ्यात तज्ज्ञांनी रस्त्याला भेट देऊन अभ्यास केला होता. त्यानुसार तातडीने काम सुरू झाले. नवीन रस्त्यावरून वाहतूक ही सुरू झाली. अतिवृष्टी पावसामुळे रस्ता दुसऱ्यादा खचला होता. आता या रस्त्यापासून ३ किमी अंतरावरील रस्ता खचला असून तटबंदी तुटून पडली आहे. रस्त्यावर रस्त्याकडील माती येऊन पडली आहे. रस्त्याकडील केबल बाहेर पडल्या आहेत. दोन दिवस संततधार पाऊस चालू राहिला तर या रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता बंद होऊ शकतो. जोतिबा डोंगरला जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या अलीकडेच हा रस्ता खचल्याने पर्यायी मार्गाचाही वापर करता येणार नाही. युद्धपातळीवर हा रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे.
१७ जोतिबा केली रोड
फोटो : कॅप्सन
१ ) जोतिबा-केर्ली या मार्गावरील पाणी पुरवठा जॅकवेल परिसरातील खचलेला रस्ता.