शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दख्खनचा राजा जोतिबाची शनिवारी चैत्रयात्रा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 10, 2025 19:57 IST

पहाटेपासून धार्मिक विधी : डोंगरावर लाखो भाविक दाखल

इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, जोतिबा : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकमधील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा श्रीजोतिबा देवाची उद्या शनिवारी वर्षातील सर्वांत मोठी चैत्रयात्रा होत आहे. यानिमित्त जोतिबा डोंगरावर गेल्या दोन दिवसांपासून लाखो भाविक दाखल झाले आहेत. गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रेआधीच डोंगर न्हाऊन निघाला आहे.

जोतिबाची वर्षातील सर्वात मोठी चैत्रयात्रा उद्या संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनातून, पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत.

असा असेल सोहळा..

१. शनिवारी मुख्य यात्रेदिवशी जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. पहाटे पाच वाजता पन्हाळा तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल.

२.सकाळी १० वाजता धुपारती सोहळा होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारी सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी १२ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने सुरू होईल.

३. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या असतात.

४.मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्तनक्षत्रावर सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होईल. तोफेच्या सलामीने पालखी जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल .

५.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी मंदिराकडे प्रस्थान होईल, ९ वाजता पालखी जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. तोफेच्या सलामीने रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान होईल. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील.

टॅग्स :Jyotiba Templeजोतिबा