शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘दिव्यांग दिना’चे औचित्य : स्वावलंबन शिबिरातून ‘सावली’चा दिव्यांगांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 11:10 IST

दिव्यांग दिनाच्या औचित्याने सावली केअर सेंटरतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत स्वावलंबन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चिपळूण येथे शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९), तर रत्नागिरी येथे १५ व १६ डिसेंबरला हे शिबिर होणार आहे.

ठळक मुद्दे‘दिव्यांग दिना’चे औचित्य : स्वावलंबन शिबिरातून ‘सावली’चा दिव्यांगांना आधारचिपळूणला शनिवारी; रत्नागिरीत १५ डिसेंबरला शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : दिव्यांग दिनाच्या औचित्याने सावली केअर सेंटरतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत स्वावलंबन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चिपळूण येथे शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९), तर रत्नागिरी येथे १५ व १६ डिसेंबरला हे शिबिर होणार आहे.दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींसाठी गेल्या १४ वर्षांपासून स्वावलंबन शिबिरे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी रविवारी येथे दिली.दिव्यांगत्व स्वीकारून कृत्रिम उपकरणांच्या साहाय्याने बऱ्याच गोष्टी स्वायत्तपणे करता येणे शक्य असते. यासाठी गरज आहे ती मानसिक उभारीची आणि छोट्या-छोट्या क्लृप्त्यांची. यासाठी ‘सावली केअर सेंटर’तर्फे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी ‘स्वावलंबन शिबिरे’ सातत्याने आयोजित केली जातात.या प्रकल्पाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील गरजूंना व्हावा, यासाठी प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. याच्या नियोजनासाठी रोटरी क्लब आॅफ चिपळूण आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सक्रिय सहभाग घेतला आहे.शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९) सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत चिपळूण येथील रोटरी हॉल, मार्कंडी, कऱ्हाड रोड येथे; तर १५ व १६ डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत रत्नागिरीतील शहर ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, आय. टी. आय. रोड, नगर वसाहत, शिवाजीनगर येथे स्वावलंबन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सेंटरच्या कोेल्हापुरातील राधानगरी रोडवरील पिराचीवाडी येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन किशोर देशपांडे आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शनसंस्थेकडे अद्ययावत उपकरणांसोबत फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, फिजिशिअन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर या तज्ज्ञांची उपलब्धता आहे. त्याचा उपयोग व मार्गदर्शन यावेळी होणार आहे.

दिव्यांगांना स्वावलंबनाचे धडेशिबिर संपताना शिबिरार्थी प्रातर्विधी, अंघोळ अशी स्वत:ची आन्हिकेच नव्हे तर कपडे धुणे, स्वयंपाक, बाजारहाट स्वबळावर करू शकतील, असा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी