केवळ रात्र होती म्हणून...

By Admin | Updated: December 5, 2014 23:37 IST2014-12-05T20:45:13+5:302014-12-05T23:37:27+5:30

दुपारी तीन वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Just because it was night ... | केवळ रात्र होती म्हणून...

केवळ रात्र होती म्हणून...

उत्तूर : रात्रीचे बारा वाजले होते. थंडीच्या कडाक्यात जोरात वाऱ्याची झुळूक आली. या वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे चार खांब रस्त्यावर पडले. जर दिवस असता, तर मोठे संकट ओढवले असते. ही घटना कर्नाटक राज्यातील गडहिंग्लज-काळभैरी मार्गावरील निपाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. काल, बुधवारी रात्री विजेचे खांब कोसळल्यामुळे हडलगे, शिप्पूर
(ता. हुक्केरी) येथील वीजपुरवठा खंडित झाला. निपाणी तिट्यापासून हडलगेच्या पाण्याच्या टाकीपर्यंत विजेचे खांब तिरके झाले
होते. तीन खांब रस्त्यावर पूर्णत: पडले. या मार्गावरून कोल्हापूर-गडहिंग्लजला ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते.
हा प्रकार वीज मंडळाला कळविण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वर्दळ नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सकाळपासून मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती. ‘केवळ रात्र होती म्हणून...’ अशी चर्चाही हडलगेकरांच्यात होती. (वार्ताहर)

Web Title: Just because it was night ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.