एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:59 AM2018-09-02T00:59:56+5:302018-09-02T01:01:44+5:30

Junking of each other: Junket | एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांची कबुली ; राजू आवळे यांना आमदार करणार



हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी एकमेकांना आलिंगन दिले व यापुढे मतभेद गाडून एकत्रित वाटचाल करण्याचे जाहीर केले. मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट करून या मनोमिलनाला पाठबळ दिले.
प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणाचीच सुरुवात राजूबाबा हा उद्याचा आमदार असल्याचे सांगून केली. ते म्हणाले, ‘आवाडे व आवळे गट आता एकदिलाने एकत्र आला आहे, ही तात्पुरती मलमपट्टी नाही. काँग्रेस दुरुस्त व्हायची असेल तर अगोदर नेत्यांतील भांडणे मिटली पाहिजेत, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धरला होता. त्यानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात केली. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या शेजारील हॉल बांधकामाच्या कार्यक्रमात त्यांनी हा विचार बोलून दाखविला व त्यानुसार आम्ही एकसंधपणे पुढे जायचे ठरविले. कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे; त्यामुळे एकेकाळी एकट्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार होते; परंतु त्यानंतर आम्ही मंडळीच एकमेकांची जिरवायच्या नादाला लागलो व त्यात आमचीच जिरली. त्यासाठी विरोधकांची गरजच उरली नाही; परंतु आता हे आम्हांला उमगले आहे. लोकांचाही रेटा आहे.’
आवाडे म्हणाले, ‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूत होते; कारण नुसता एक खडा पाण्यात टाकल्यावर जसे वलय उमटते,
तसेच या तिन्ही मतदारसंघांचे राजकारण आहे. पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांनी उचलून घेतले तर राजूबाबांची गाडी विधानसभेला जाण्यात अडचण नाही. राजूबाबा असेल किंवा गणपतराव पाटील; हे काय आमच्यासाठी वेगळे नाहीत.’
आवाडे व आवळे यांची गळाभेट ही काँग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही जो उमेदवार सुचवाल तोच आमचा उमेदवार असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
जयवंतराव आवळे म्हणाले, ‘काँग्रेसवर मनापासून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे; परंतु दुहीमुळे आमचा पराभव झाला. मी व आवाडे गेल्या पंधरा वर्षांत कधीही एका व्यासपीठावर आलो नव्हतो; परंतु आज आवाडे-आवळे एकत्र आले आहेत. जे झालं ते गंगेला मिळालं. आता यापुढे हातात हात घालून पुढे जाऊ या.’


हातकणंगले लोकसभाही घ्या
आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३१) कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला.
हातकणंगलेची जागा तर गेल्या निवडणुकीत आम्हीच लढवली आहे. त्यामुळे मित्रपक्षांसोबत आघाडी झाली तर हा प्रश्न
येणार नाही; परंतु ती नाही झाली तर हा मतदारसंघही काँग्रेसला मिळावा, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली.
शिरोलीतून सुरुवात ही नांदी
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात शिरोलीत झालेल्या जंगी स्वागताने झाली, याचा वेगळाच आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीत मला जे जमले नाही ते आता यशस्वी झाले.
फेव्हीक्विक एकजूट
आवाडे व आवळे यांची एकजूट ही चिकटपट्टीची नाही, तर ती फे व्हीक्विकसारखी मजबूत असल्याने आता तुटणार नाही, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच हशा पिकला.
सहा आमदार
कोल्हापुरात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही; परंतु नेत्यांनी मतभेद गाडून टाकले तर दहापैकी किमान सहा आमदार काँग्रेसचे होण्यात अडचण नसल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच आवाडे-आवळे एकाच व्यासपीठावर
‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूत
तुम्ही जो उमेदवार सुचवाल
तोच आमचा उमेदवार असेल,
अशी अशोक चव्हाण यांची
ग्वाही.

 

Web Title: Junking of each other: Junket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.