शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गूळ सौदे बंदच; शेतकऱ्यांचे नुकसान : बाजार समितीत तिसºया दिवशीही वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:55 IST

कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ ...

ठळक मुद्देदोन कोटींचे रवे पडून; मार्केट चोवीस तास सुरू ठेवा

कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ सौदे गुरुवारी तिसºया दिवशीही बंद राहिले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुमारे दोन कोटींचे जवळपास ४० हजार रवे बाजार समितीमध्ये पडून आहेत.दरम्यान, गुरुवारी गूळ उत्पादक शेतकºयांच्या व्यापक शिष्टमंडळाने बाजार समिती प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. हंगाम अंतिम टप्प्यात असताना या वादात गुळाचे दर पाडले जात असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. त्याकरिता वेळेचे बंधन न घालता २४ तास गुळाची आवक व जावक सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीमध्ये गूळ व्यापारी व माथाडी यांच्यात वेळेवरून वाद सुरू आहे. सोमवारी (दि. १८) सहा व्यापाºयांनी माथाडींकडून एक तास जादा काम करून घेतले. त्यातून माथाडी कामगारांनी बुधवारी (दि. २०) तिरूपती ट्रेडर्स, अजितकुमार नवरलाल शहा, पद्मावती ट्रेडिंग कंपनी, रावळ एंटरप्रायजेस, जे. के. ट्रेडर्स व खोडीदास नेमचंद शहा या सहा व्यापाºयांचे सौदे काढले नाहीत. या व्यापाºयांचा माथाडींशी पुन्हा जोरात वाद झाला. दुपारनंतर सौदे काढण्यास माथाडी तयार झाले; परंतु माथाडी या सहा व्यापाºयांकडे आलेच नाहीत; त्यामुळे चिडून गुरुवारी या व्यापाºयांनी गूळ सौदे बंद ठेवले. व्यापारी व माथाडी आपापल्या भूमिकेशी ठाम असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

या वादाचा फटका बसल्याने संतप्त झालेल्या गूळ उत्पादक शेतकºयांनी गुुरुवारी थेट बाजार समितीत येऊन प्रशासनाला जाब विचारला. नुकसान टाळण्यासाठी २४ तास गुळाची आवक-जावक सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.शिष्टमंडळात भगवान काटे, सागर चौगुले, अजित पाटील, संतोष तोरसे, सुवर्णसिंग किल्लेदार, अमित पाटील, विजय लाड, संजय कांबळे, सचिन जाधव, श्रीपती कळके, आदींसह तुरंबे, तळाशी, खुपीरे, पोर्ले, अर्जुनवाडा, वाघापूर, कोलोली, फुलेवाडी, माजगाव, भुयेवाडी, लाडवाडी, तिरपण येथील गूळ उत्पादक शेतकºयांचा समावेश होता.वादावर आज बैठकसौदे बंद राहिल्याने शेतकºयांचे नुकसान होत असल्याने सचिव मोहन सालपे यांनी आज, शुक्रवारी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.गुरुवारी पाच व १० किलोच्या गुळाचे सौदे बंद राहिले. असे असले तरी एक किलो गुळाच्या १० हजार बॉक्सचे सौदे काढण्यात आले.

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर