शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Bribe Case: दहा हजाराची लाच स्वीकारताना कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:03 IST

नवीन नळ कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी

कोल्हापूर : दोन नवीन नळ कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, रा. प्लाॅट नं.३, आर.के.नगर, सदाशिव दिंडे काॅलनी कोल्हापूर) असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपतच्या या कारवाईनंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली.तक्रारदार हा महापालिकेचा मान्यता प्राप्त प्लंबर आहे. त्याने त्याचे ग्राहक असलेल्या दोघाचे नवीन नळ कनेक्शनकरीता महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज केला. तक्रारदाराकडे नवीन दोन नळ कनेक्शन प्रकरण मंजूर करण्याकरीता संशयित हुजरे याने दहा हजार रुपयांची मागणी केली.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनूसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून हुजरे यास रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे व अपर पोलिस उपायुक्त सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, अंमलदार शरद पोरे, रुपेश माने, संदीप पडवळ यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग