राज्य सरकारला १० जूनचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:47+5:302021-06-09T04:29:47+5:30
जयसिंगपूर : महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करावी व ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी, यासाठी गेल्या आठ ...

राज्य सरकारला १० जूनचा अल्टिमेटम
जयसिंगपूर : महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करावी व ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी, यासाठी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संयुक्त विद्यार्थी संघटनेच्यावतीने लढा सुरू आहे. याबाबत १० जूनपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाहीतर राज्य सरकारविरोधात विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष स्वप्निल पवार यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी आणि ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी लढा सुरू आहे. अशाप्रकारची चळवळ सुरू असताना जवळपास चाळीसहून अधिक लोकप्रतिनिधींसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली आहे.
दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्निल पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर सामंत यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. अद्यापही सरकारने बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे १० जूनअखेर याबाबत तोडगा निघाला नाहीतर राज्य सरकारविरोधात विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.