शांतिसेन महाराज यांचे निर्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST2021-03-30T04:15:14+5:302021-03-30T04:15:14+5:30

श्री १०८ शांतिसेन महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव बाळिशा गतारे (रा. शिरटी). अत्यंत धार्मिक स्वभावामुळे त्यांनी जैन मंदिरासाठी जागा दिली. त्यातूनच ...

Judgment of Shantisen Maharaj | शांतिसेन महाराज यांचे निर्याण

शांतिसेन महाराज यांचे निर्याण

श्री १०८ शांतिसेन महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव बाळिशा गतारे (रा. शिरटी). अत्यंत धार्मिक स्वभावामुळे त्यांनी जैन मंदिरासाठी जागा दिली. त्यातूनच आचार्य बाहुबली महाराजांच्या सान्निध्यामध्ये येऊन त्यांनी क्षुल्लक दीक्षा घेतली. सन २०१० साली त्यांनी शिरटी पंचकल्याणिकामध्ये १२ वर्षांची नियम सल्लेखना व्रत घेतले होते. त्यांनी आचार्य देवसेन, आचार्य धर्मसेन, आचार्य जिनसेन यांच्याकडून दिगंबर दीक्षा घेतली. जवळपास २० दिवसांपासून सल्लेखना सुरू होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यमसल्लेखना घेतली होती. यमसल्लेखनाच्या पाचव्या दिवशी त्यांचे निर्याण झाले. महाराजांचा अंत्यविधी जैन धर्मानुसार यमसल्लेखनापूर्वक पार पडला. हा विधी आचार्य श्री १०८ देवसेन महाराज, आचार्य श्री १०८ धर्मसेन महाराज, आचार्य श्री १०८ जिनसेन महाराज यांच्या मंगल मार्गदर्शनाखाली, तर नांदणी मठाचे भट्टारक स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधीवत अंत्यविधी पार पडला.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-१०-श्री १०८ शांतीसेन महाराज

Web Title: Judgment of Shantisen Maharaj