स्वयंभू महादेवाची यात्रा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST2021-08-14T04:30:12+5:302021-08-14T04:30:12+5:30

स्वयंभूवाडी (ता. करवीर) येथे स्वयंभू नागपंचमी यात्रा साध्या पद्धतीने पार पडली. यावर्षीही नागपंचमी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवून मंदिर ...

The journey of Swayambhu Mahadev simply | स्वयंभू महादेवाची यात्रा साधेपणाने

स्वयंभू महादेवाची यात्रा साधेपणाने

स्वयंभूवाडी (ता. करवीर) येथे स्वयंभू नागपंचमी यात्रा साध्या पद्धतीने पार पडली. यावर्षीही नागपंचमी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते तरीही भाविकांमध्ये उत्साह मात्र कायम राहिला. मंदिर बंद असूनही दारातून दर्शन घेतले. ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाविकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अनेक भक्तांनी मात्र नियमांचे पालन करत दर्शन घेतले.

नागपंचमी सणाला कोरोनाची किनार मिळाल्याने स्वयंभूवाडी नागपंचमी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे यंदाही स्वयंभू नागपंचमी यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. परंपरेनुसार विधिवत पूजा रात्री १२ नंतर करण्यात आली. यात्रेनिमित्त स्वयंभूची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या पार्शभूमीवर भाविकांना न येण्याचे आवाहन करण्यात आले होते तरीही अनेक भाविकांनी मात्र कोरोना नियमांचे पालन करत दर्शन घेतले.

Web Title: The journey of Swayambhu Mahadev simply