शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चांगभलच्या गजरात आज जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 11:13 IST

Jotiba Mandir Kolhapur: कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा  दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते . हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापुरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात .

- दत्तात्रय धडेलजोतिबा  - चांगभलच्या गजरात आज जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरूवात झाली . हजारो भाविकांनी कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते.  कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा  दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते . हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापुरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात . कोल्हापूर शहरा बरोबरच आता महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठया श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत.

आज रविवारी पहिला खेटा मोठया भक्तीमय वातावरणात सुरुवात झाला .पहाटे तीन पासुनच कोल्हापूर , वडणगे ,  निगवे , कुशिरे ' गाय मुख मार्गे  जोतिबा मंदिरात भाविक चालत आले.जोतिबा डोंगरच्या पाय वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या.चांगभलं चा गजर डोंगर घाटातून घुम लागला.आज पहिल्याच खेट्याच्या रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. मंदिराजवळ असणाऱ्या नवीन दर्शन मंडप इमारतीमध्ये  दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे . रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी ८ते९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती निघाली .,दुपारी ३ ते४ अभिषेक होणार आहे, रात्री पालखी निमणार आहे . पुजारी व प्रशासनामार्फत येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा साठी जय्यत तयारी केली आहे ..जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून  जोतिबा  दर्शनासाठी  खेटा घातल्याची आख्यायिका जोतीबाच्या पूजाऱ्यांकडून  सांगण्यात  आली.

यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनि  शीतल डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूर