शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबाचा सरता रविवार उत्साहात; आता पालखी सोहळा चार महिने बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:00 IST

लाखो भाविकांनी केली गुलाल खोबऱ्यांची उधळण

जोतिबा : जोतिबा देवाचा सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण केली. आता पालखी सोहळा चार महिने बंद असून, खंडेनवमीला पालखी सोहळा निघणार आहे.जोतिबा मंदिरात सरता रविवारनिमित्त सकाळी देवास पंचामृत व आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. श्री जोतिबा देवाची सरता रविवार उत्सव महापूजा बांधली. वैशाख महिना आणि मेची सुटीमुळे दर्शनासाठी भाविकांनी जोतिबा दर्शन मंडपात दोन मजली रांगा लावल्या होत्या. वावरजत्राची संख्या लक्षणीय होती. नववधूबरोबर परिवारासह पाहुणे यांची ही जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि शीतल डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैणात होता. सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला.भाविकांनी गुलाल-खोबऱ्यांची उधळण करून धुपारतीचे दर्शन घेतले. दुपारी तीन वाजता अभिषेक करून जोतिबा देवाची सरदारी पगडी महापूजा बांधली. रात्री आठ वाजता महाघंटेचा नाद होताच श्री जोतिबाचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला.देवस्थान समितीचे नूतन प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झगर, सरपंच राधा बुणे, पोलिस पाटील बाळासाहेब पाटील, तसेच मानाचे गावकरी उपस्थित होते. भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर-पेढे वाटले. घरोघरी आमरस नैवेद्य करण्यात आला. विष्णू सातार्डेकर, अंकुश सातार्डेकर यांनी पालखी सदरेवर आकर्षक कमानीची सजावट केली.पालखी सोहळा चार महिने बंद जोतिबा देवाचे उंट, घोडे विश्रांतीसाठी पोहाळेत जाणार. जोतिबाचा पालखी सोहळा चार महिने बंद राहणार असून आता खंडेनवमीला निघणार असल्यामुळे उंट, घोडे चार महिने विश्रांतीसाठी जोतिबा डोंगरच्या पायथ्याशी पोहाळे गावात सोमवारपासून जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा