शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:55 IST

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली.

कोल्हापूर : कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर दोन वर्षांनी श्री जोतिबा यात्रा होत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी मानाच्या सासनकाठ्यांच्या पूजनावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संदेशाची देवाणघेवाण करता येण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिमसह पर्यायी संदेश व्यवस्था तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केल्या. यावेळी त्यांनी दर्शन मंडप व मंदिर परिसराची पाहणी केली.

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या तयारीबाबत, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी देवस्थान समितीच्या तयारीची माहिती दिली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी रेखावार यांनी बजावले..

  • डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका.
  • भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, बसवाहतूक, पार्किंग, आरोग्य सोयी- सुविधा पुरवा.
  • रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून घ्या.
  • डोंगरावरील अंतर्गत रस्ते, वाहनतळ मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करा.
  • दर्शन रांग मार्गाची तसेच चालत जाण्याच्या मार्गावर दगड, खडी येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्ती करुन घ्यावी.
  • भाविकांना पिण्याचे पाणी अपुरे पडू नये, यासाठी जादा क्षमतेचे पाण्याचे टँकर पुरवा.
  • फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पंप सुस्थितीत असल्याची खात्री करा. 

रस्त्यावर गाड्या लागणार नाहीत...दर्शन मंडप उभारणी व मंदिर परिसराची पाहणी केल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास सहजपणे बाहेर पडता येण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहनतळाची व्यवस्था करावी. दुचाकी, चारचाकी वाहनतळ, दर्शन मार्ग, बाहेर पडण्याचा मार्गाचे माहितीफलक त्या त्या ठिकाणी लावण्यात यावेत. रुग्णवाहिका तैनात ठेवावी. आगीपासून सुरक्षेसाठी व्यावसायिक व स्थानिकांनी आग प्रतिबंधक नळकांडी ठेवून खबरदारी घ्यावी. भेसळयुक्त अन्न पदार्थ व भेसळयुक्त गुलालाची विक्री होणार नाही याची काळजी घ्या. यात्रेनंतर डोंगर परिसरात कचरा राहू नये तसेच दुर्गंधी होऊ नये यासाठी स्वच्छता, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाPoliceपोलिस