जोतिबा देवाचे मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:17+5:302021-06-19T04:17:17+5:30
जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्या धुपारती ,पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या ...

जोतिबा देवाचे मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल
जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्या धुपारती ,पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो. या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो. यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो. यानंतर दस-यातील घटस्थापनेदिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो. या दरम्यान उंट व घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते. तसेच या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर थंड हवा असते. त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणले जाते. पोहाळे येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे. या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत, त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो.
फोटो –
जोतिबा देवस्थानचे उंट व घोडे जोतिबा डोंगरावरून पोहाळे येथे पोहचले आहेत. त्याच्यासोबत देवस्थानचे कर्मचारी.