संयुक्त लाइन बझार, छावा, हनुमान ब्लेसिंग आदींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:35+5:302021-01-25T04:23:35+5:30
कोल्हापूर : लाइन बझार हाॅकी मैदानावर माॅर्निंग प्रॅक्टिसतर्फे यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सेव्हन साइड हाॅकी स्पर्धेत संयुक्त ...

संयुक्त लाइन बझार, छावा, हनुमान ब्लेसिंग आदींची बाजी
कोल्हापूर : लाइन बझार हाॅकी मैदानावर माॅर्निंग प्रॅक्टिसतर्फे यशवंतराव निकम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सेव्हन साइड हाॅकी स्पर्धेत संयुक्त लाइन बझार, छावा मित्र मंडळ, हनुमान ब्लेसिंग, पद्मा पथक, तडाका तालीम या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
शनिवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात संयुक्त लाइन बझार संघाने यजमान माॅर्निंग प्रॅक्टिस संघाचा २-१ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात छावा मित्रमंडळने तडाका तालीमचा ६-० असा दणदणीत पराभव केला. तिसऱ्या सामन्यात पोलीस बाॅइज संघाने हनुमान ब्लेसिंगचा १-० असा निसटता पराभव केला. चौथा सामन्यांत पद्मा पथक संघाने शिवतेज तरुण मंडळचा २-१ असा पराभव केला. पाचव्या सामन्यात तडाका तालीमने मराठा वाॅरिअर्सचा १-० असा पराभव केला. स्पर्धेचे उद्घाटन कमलाकर चव्हाण व निवास जाधव, योगेश निकम यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून मंगेश खोत, ओंकार कावरे, दीपक पाटील, राहुल गावडे, मोहसीन पठाण, सुशांत निंबाळकर, राजवर्धन तोडकर, आदित्य भोसले, अभिजीत पाटील यांनी काम पाहिले.