शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वारसांना थेट व्हॉट्सॲपवर नोकरीची ऑर्डर, आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:22 IST

सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ठळक मुद्दे वारसांना थेट व्हॉट्सॲपवर नोकरीची ऑर्डर, आयुक्तांचा निर्णय लोकमतचा प्रभाव : लाचप्रकरणाच्या चौकशीचे आदेश

कोल्हापूर : सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.वारसाला नोकरी पाहिजे असल्यास ७० हजार रुपये द्या, असे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने महापालिकेमध्ये खळबळ उडाली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वारसांनी नोकरीसाठी अशा प्रवृत्तीला बळी पडू नये म्हणून थेट व्हॉटसॲपवरच ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला. अर्जावर आयुक्तांची सही झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुढील कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात यामध्ये संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे कोणाला पैसे देण्याची गरजच भासणार नाही.आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची कर्मचारी संघटनेसोबत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी बैठक झाली. झाडू कामगारांच्या वारसांकडून नोकरीसाठी पैशाची मागणी होत असल्यास हे चुकीचे आहे. कष्टकरी लोकांबाबतच असा प्रकार होणे हे मनाला दु:ख देणारे असल्याचेही आयुक्तांनी बोलून दाखविले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संघटनेशी कोणी संबंधित नाही. दोषींवर कारवाई केल्यास आमची कोणतीच तक्रार नसेल, असे स्पष्ट केले.चौकटकदमवाडी झोपडपट्टीतील झाडू कामगाराच्या मुलग्याचा अर्ज कोणत्या विभागात, कोणत्या अधिकाऱ्याकडे, किती दिवस प्रलंबित राहिला याची माहिती लेबर ऑफिस घेत आहे. याचा सविस्तर अहवाल साहाय्यक आयुक्त कुंभार यांना दिला जाणार आहे.

वारसाच्या नोकरीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा आणला जाणार आहे. पैशाची मागणी होत असल्याप्रकरणी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामधील दोषींवर कारवाई केली जाईल.डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपkolhapurकोल्हापूर