जयवंतराव शिंपी यांचा कार्यालय प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:37+5:302021-07-18T04:18:37+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. आमदार राजेश पाटील यांच्या ...

जयवंतराव शिंपी यांचा कार्यालय प्रवेश
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते फित कापून हा प्रवेश करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील, खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, शशिकांत खोत, प्रसाद खोबरे, आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी उपस्थित होते.
प्रवेशानंतर जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात खासदार मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शिंपी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सर्वच वक्त्यांनी शिंपी यांनी शिक्षण, सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या ४० वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेऊन गौरव केला. आजरा पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजी गुरव, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अलका शिंपी यांच्यासह आजरा तालुक्यातील कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.
१७०७२०२१ कोल जयवंत शिंपी
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचा कार्यालय प्रवेश आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या वेळी डावीकडून ए. वाय. पाटील, अरुण इंगवले, अध्यक्ष राहुल पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.