‘दौलत’साठी जयंत पाटील उत्सुक

By Admin | Updated: July 11, 2015 00:06 IST2015-07-11T00:06:28+5:302015-07-11T00:06:28+5:30

‘गुगली’ने उलट-सुलट चर्चा : चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार

Jayant Patil is eager for 'Daulat' | ‘दौलत’साठी जयंत पाटील उत्सुक

‘दौलत’साठी जयंत पाटील उत्सुक

कोल्हापूर : हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विकत घेण्यास राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील उत्सुक आहेत. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आमदार पाटील यांनी तो चालविण्यास घेण्याची ‘गुगली’ टाकल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ते कारखाना विकत घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
कारखाना चार हंगाम बंद आहे. कारखान्यावर साडेतीनशे कोटींचे कर्ज आहे. ‘दौलत’ला दिलेल्या कर्जवसुलीचे जिल्हा बँकेसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने कर्जापोटी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी तीन वेळा निविदा काढली. मात्र, तो चालविण्यास घेण्यासंबंधी एकही निविदा आली नाही. शेवटचा मार्ग म्हणून बँकेने कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे.
कारखाना विक्रीला ‘दौलत बचाव कृती समिती’चा विरोध आहे. ‘जागा विका; पण कारखाना वाचवा,’ असाही प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात कृती समितीने दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये कारखाना विकत घेणार म्हटल्यानंतर चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार आहे. बंद कारखान्याला मदत करण्याची जिल्हा बँकेची आर्थिक कुवत राहिलेली नाही. त्यामुळे कारखाना जयंत पाटीलच विकत घेतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा बँकेने सुलभ हप्ते पाडून दिल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ, असे जयंत पाटील यांनी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते कारखाना चालविण्यास उत्सुक आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. नंदा बाभूळकर,
नेत्या, राष्ट्रवादी


बँकेने तीन वेळा निविदा काढली त्यावेळी जयंत पाटील यांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे कारखाना चालवायला नव्हे तर विकत घेण्यासच ते उत्सुक असल्याचे स्पष्ट होते. पहिल्यादांच विकत घेणार म्हटल्यावर चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार आहे. ‘चालविण्यास घेणार’ असे सांगत ते विकत घेतील.
- राजेंद्र गड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Jayant Patil is eager for 'Daulat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.