जयंत आसगावकर यांनी घेतली शाहू छत्रपतींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:16 IST2020-12-07T04:16:57+5:302020-12-07T04:16:57+5:30
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शाहू छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे जाऊन भेट ...

जयंत आसगावकर यांनी घेतली शाहू छत्रपतींची भेट
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शाहू छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे जाऊन भेट घेतली. आमदार आसगावकर यांना शाहू छत्रपती यांची खूप मदत झाल्याने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार आसगावकर यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मालोजीराजे छत्रपती, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, उदय पाटील, ‘कोजिमाशि’चे संचालक समीर घोरपडे, के. के. पाटील, संदीप पाटील, शिवाजीराव लोंढे, प्रा. एस. पी. चौगले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी कोल्हापुरात न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी शिवाजीराव लोंढे, राजेंद्र सूर्यवंशी, मालोजीराजे छत्रपती, समीर घोरपडे, एस. पी. चौगले, आदी उपस्थित होते. (फोटो-०६१२२०२०-कोल-आसगावकर)
- राजाराम लोंढे