‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:48 PM2020-01-13T15:48:19+5:302020-01-13T15:51:11+5:30

छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाºया लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी...जय शिवाजी...चा जयघोष करत जय गोयल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

 Jay Goel protests with 'slippers' movement: Shiv Sena protests | ‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी चौकात सोमवारी शिवसेनेतर्फे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपती शिवरायांचा ऐकेरी उल्लेख करणाऱ्यां लेखक जय भगवान गोयल यांच्या निषेधार्थ चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे ‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी...जय शिवाजी...चा जयघोष करत जय गोयल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

छत्रपती शिवाजी चौकात शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकवटले. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी, तसेच ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पक्षाच्या अध्यक्षानी जाहीर माफी मागावी आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली. यापुढे महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला. लेखकाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारुगले, दीपक गौड, किशोर घाटगे, रणजित जाधव, महेश उत्तुरे,दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, अजित राडे, रमेश खाडे,महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, रुपाली कवाळे, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार,आदी सहभागी झाले होते.

 

 

Web Title:  Jay Goel protests with 'slippers' movement: Shiv Sena protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.