जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:37+5:302021-04-27T04:23:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुरू करण्यात ...

जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुरू करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, तसेच कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीत ७५ बेडचे कोविड केअर केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
आवाडे म्हणाले, शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयजीएममध्ये बेडची क्षमता वाढविण्याची गरज आहे. तसेच ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने रुग्णालयाच्या आवारातच ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शहरामध्ये लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने आणखी केंद्रे वाढविण्याची गरज आहे. सध्या २१ लसीकरण केंद्रे असून, आणखी २९, अशी एकूण ५० केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत.
बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, जि.प. सदस्य राहुल आवाडे, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, वैद्यकीय अधीक्षक रवींद्र शेट्ये, आरोग्य सभापती संजय केंगार आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२६०४२०२१-आयसीएच-०२
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, जि.प.सदस्य राहुल आवाडे, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे आदी उपस्थित होते.
छाया-उत्तम पाटील