फरार कैदी जावीर नांदेडमध्ये गजाआड
By Admin | Updated: April 3, 2015 01:12 IST2015-04-03T01:09:35+5:302015-04-03T01:12:16+5:30
दोन साथीदारही अटकेत : पन्हाळ्यात पोलिसांच्या हातावर दिली होती तुरी

फरार कैदी जावीर नांदेडमध्ये गजाआड
कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात साक्ष देण्यासाठी नेताना पोलिसांच्या डोळ््यांत चटणीपूड टाकून पळून गेलेला विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (वय ३५, रा. कारंडे मळा शहापूर, इचलकरंजी) याच्यासह त्याचे साथीदार पिंटू जाधव व अंकुश गारड या तिघांना नांदेड येथे अटक केली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. गतवर्षी ८ डिसेंबरला जावीर हा दोन साथीदारांच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या प्रकरणी त्यावेळी दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले की, कैदी विजय जावीर बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने कोतोली (पान १० वर)
कटाचा उलगडा आज होणार
विजय जावीरला पसार करण्यासाठी त्यांनी प्लॅन कसा रचला. जावीर कारागृहात असताना त्यांची भेट, चर्चा कोठे झाली. पसार झाल्यानंतर ते कुठे गेले. नांदेडमध्येच राहण्याचा त्यांनी निर्णय का घेतला. गेली चार महिने ते काय काम करत होते. त्यांना यासाठी आणखी कोणी मदत केली, याची संपूर्ण माहिती पोलीस घेत आहेत. आज, शुक्रवारी या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये अपार्टमेंटला चारही बाजूने सापळा रचून आवळल्या मुसक्या
जावीर व त्याचे साथीदार नांदेड येथील शिवाजीनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ एक विशेष पथक नांदेडला रवाना केले.
याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपार्टमेंटला चारही बाजूंनी घेरून जावीर राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून त्याने व साथीदारांनी प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. याठिकाणीच त्यांना खाकीचा प्रसाद दिला. त्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री कोल्हापुरात आणले.
पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्यासमोर तिघांनाही उभे केले. जावीरचा साथीदार पिंटू जाधव हा सांगली येथील मोक्काच्या कारवाईमध्ये पसार होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर अंकुश गारडने जावीर याला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्नझाले आहे.