पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या आज जाहीर झालेल्या निकालात आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षाने विजयाची परंपरा कायम राखत पन्हाळ्याचा गड पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवला. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत जनसुराज्यच्या उमेदवार जयश्री पोवार यांनी १०७२ मतांच्या निर्णायक फरकाने विजय मिळवला. आमदार डॉ. कोरे यांनी सर्व राजकीय घटकांना सोबत घेऊन नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्याला संपूर्ण यश मिळाले नाही. परिणामी सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर नगराध्यक्षपदासह चौदा नगरसेवक पदांसाठी थेट निवडणूक घ्यावी लागली. जनसुराज्य शक्ती पक्ष विरुद्ध अपक्ष उमेदवारांमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. मात्र मतदारांनी जनसुराज्य शक्ती पक्षालाच कौल दिला.जनसुराज्यने सत्ता कायम राखली असली, तरी सर्व आघाड्यांना सोबत घेऊनही चार अपक्ष उमेदवार विजयी होणे आणि काही उमेदवारांचा अत्यंत निसटता पराभव होणे, ही बाब आगामी राजकीय वाटचालीसाठी आमदार कोरे यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी ठरणार आहे. पन्हाळ्यात प्रथमच फुलले कमळ पन्हाळा नगर परिषेदेच्या इतिहासात प्रथमच भाजपने दोन जागेवर कमळ चिन्हावर निवडणूक लढवत दोन्ही जागेवर विजय संपादन केल्याने पन्हाळ्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलले.
निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग प्रमांक १ १अ प्रतीक्षा योगेश वराळे जनसुराज्य,१ब महेश धोंडीराम भाडेकर अपक्ष प्रभाग प्रमांक २ २अ प्रियंका मारुती गवळी शिव शाहू आघाडी २ब सतीश कमलाकर भोसले शिव शाहू आघाडी प्रभाग प्रमांक ३ ३अ रामानंद बाबुराव पर्वतगोसावी जनसुराज्य ३ब समीना जमीर गारदि जनसुराज्यप्रभाग क्र.४ ४अ संज्योती माणिक नायकवडी भाजपा ४ब मिलिंद माधव कुराडे भाजपा प्रभाग क्र.५ ५अ तेजस्विनी संजय गुरव जनसुराज्य ५ब अभिजीत दीपक गायकवाड जनसुराज्य प्रभाग क्र.६ ६अ लक्ष्मण नारायण कांबळे जनसुराज्य ६ब प्रगती अनुप गवंडी जनसुराज्य प्रभाग क्र.७ ७अ सध्या जितेंद्र पवार जनसुराज्य ७ ब प्रदीप प्रभाकर गवळी अपक्ष प्रभाग क्र.८८ अ सखाराम शामराव काशीद जनसुराज्य ८ब दिपाली संतोष काशीद अपक्ष प्रभाग क्र.९ ९ अ रशिदा मन्सूर मुजावर शाहू महा आघाडी ९ ब असिफइकबाल रफिकअहमद मोकाशी शाहू महा आघाडी प्रभाग क्र.१० १०अ शबाना तौफिक मुल्ला शाहू महा आघाडी १० ब शहाबाज शब्बीर मुजावर अपक्ष
Web Summary : In Panhala, Kore's Janarajya Shakti retained power. Jayashree Powar won the mayoral race. BJP secured two seats for the first time, marking its entry in Panhala politics. Four independent candidates also won.
Web Summary : पन्हाला में, कोरे की जनराज्य शक्ति ने सत्ता बरकरार रखी। जयश्री पोवार महापौर चुनाव जीतीं। भाजपा ने पहली बार दो सीटें हासिल कीं, जो पन्हाला की राजनीति में उसकी एंट्री है। चार निर्दलीय उम्मीदवार भी जीते।