झाशी चौक प्रथम

By Admin | Updated: August 17, 2014 22:33 IST2014-08-17T21:47:11+5:302014-08-17T22:33:31+5:30

जयसिंगपूरमध्ये गणराया अवॉर्डचे वितरण : ग्रामीणमधून शिवनेरी मंडळ प्रथम

Janshi Chowk first | झाशी चौक प्रथम

झाशी चौक प्रथम

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्यावतीने दिला जाणारा गणराया अवॉर्ड शहरी विभागातून झाशी चौक तर ग्रामीण विभागातून संभाजीपूरच्या शिवनेरी मंडळाने पटकाविला. शहरी विभागातून युवा शक्ती-द्वितीय, युवा सम्राट-तृतीय तर दिपनगर व साईनाथ मंडळ यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. ग्रामीणमधून धैर्यशील मंडळ चिपरी - द्वितीय, शक्तीपीठ मंडळ दानोळी- तृतीय तर अजिंक्य ग्रूप उदगांव व हनुमान तालीम कोथळी यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.
येथील सिद्धेश्वर यात्री सभागृहात गणराया अवॉर्ड प्रदान कार्यक्रम पार पडला. आमदार डॉ. सा. रे. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा, नगराध्यक्षा सुनिता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, पोलीस उपाधिक्षक प्रकाश घारगे, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला.
जिल्हा पोलीस प्रमुख शर्मा म्हणाले, जयसिंगपूर शहरात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव वैशिष्यपुर्ण असतो. समाजात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच येथील गणेश मंडळे समाज प्रबोधनासाठी धडपडत असतात. जयसिंगपूरच्या गणेशोत्सवाचा आदर्श अवघ्या कोल्हापूर जिल्ह्णाने घेण्यासारखा आहे.यावेळी सुकुमार सकाप्पा, सुदर्शन पाटील, रमेश शिंदे, वसंत पडीयार, राजेश झंवर यांच्यासह पोलीस पाटील व गणराया अ‍ॅवार्ड परिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्वागत केले. नगरसेवक संभाजी मोरे, राजेंद्र नांद्रेकर, विनोद चोरडीया, सर्जेराव पवार, अशोक कोळेकर, राजेंद्र झेले, सतिश मलमे, सुरज भोसले, संभाजीराजे नाईक, विठ्ठल मोरे, सुनिल शेळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Janshi Chowk first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.