शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निमशिरगावमध्ये संविधानाचा जागर : घटनेवर स्वाक्षरी असलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:28 IST

राष्ट्रीय एकात्मता जोपासत शांततेच्या मार्गाने विकासपथावर नेणारे संविधान हा देशाचा भक्कम आधार आहे. यामुळे देशातील नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क प्राप्त झाले. अशा महत्त्वपूर्ण संविधानावर स्वाक्षरी करण्याचा सन्मान देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांना लाभला.

ठळक मुद्दे चार टप्प्यांत उपक्रम

घन:शाम कुंभार ।यड्राव : राष्ट्रीय एकात्मता जोपासत शांततेच्या मार्गाने विकासपथावर नेणारे संविधान हा देशाचा भक्कम आधार आहे. यामुळे देशातील नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क प्राप्त झाले. अशा महत्त्वपूर्ण संविधानावर स्वाक्षरी करण्याचा सन्मान देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांना लाभला. त्यांचे जन्मगाव निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे संविधान जागृतीचा उपक्रम चार टप्प्यांत राबविण्यात येणार आहे, असा उपक्रम राबविणारे हे देशातील पहिले गाव ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात गावातील प्रत्येक घर, शाळा व संस्थांमध्ये संविधानाची प्रत व संविधान प्रास्ताविकाचे पोस्टर लावणे, याचबरोबर संविधानासंबंधी माहिती असणाऱ्या पुस्तकांचे वाटप करणे, गावातील प्रमुख ठिकाणी नागरिकांचे हक्क, कर्तव्ये व पंचायतराज संबंधी माहितीचे फलक लावणे. तर दुसºया टप्प्यात स्वातंत्र्य चळवळीपासून संविधान विकासक्रम, संविधान सभेचे कामकाज, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रत्नाप्पाण्णा कुंभार, आदी नेत्यांचे संविधानसभांचे फोटो व माहितीचे प्रदर्शन भरविणे, तिसºया टप्प्यात वर्षभरात संविधान जागराचे चार कार्यक्रम करणे. चौथ्या टप्प्यात गाव विकासासाठी सुचविलेल्या विकासकामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून प्रत्यक्ष श्रमदानातून ग्रामविकास एकसंघपणे करत राहणे.

निमशिरगाव हे रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव आहे. रत्नाप्पाण्णांची स्वाक्षरी भारताच्या घटनेवर आहे. याचा सार्थ अभिमान गावाला आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी, यासाठी जी संकल्पना अंनिसचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी मांडली. त्यानुसार गावातील प्रत्येक घरांच्या दरवाजावर संविधानाची प्रस्तावना लावून येणाºयांचे स्वागत करून संविधानाचे महत्त्व वाढविण्यात येणार आहे.- प्रा. शांताराम कांबळे, निमशिरगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndiaभारत