आजऱ्यातील जनता बँक ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:44+5:302021-09-27T04:24:44+5:30

: क्रियाशील सभासदासाठी एक हजार शेअर्स खरेदी करा आजरा : आजऱ्यातील जनता बँक येत्या मार्चअखेर ३०० कोटी ठेवींचा टप्पा ...

Janata Bank in Ajmer will cross the 300 crore deposit mark | आजऱ्यातील जनता बँक ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार करणार

आजऱ्यातील जनता बँक ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार करणार

: क्रियाशील सभासदासाठी एक हजार शेअर्स खरेदी करा

आजरा : आजऱ्यातील जनता बँक येत्या मार्चअखेर ३०० कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा संचालक मंडळाने नियोजन केले आहे. सभासदांनी क्रियाशील सभासद होण्याकरिता एक हजार रुपयांचा शेअर्स धारण करावा, असे आवाहन अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. ते बँकेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजित ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

एमआर फर्नांडिस यांनी स्वागत केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी उत्तर दिले.

बँकेकडे २६ कोटी ८ लाखांच्या ठेवी चालू आर्थिक वर्षात वाढल्या आहेत; तर १५ कोटी ८३ लाखांची कर्जे वाढली आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवउद्योजकांना ८ कोटींचे कर्जवाटप केले आहे; तर ठेवींना पाच लाखांचे विमा संरक्षण दिले आहे. चालू वर्षी ऐतिहासिक ढोबळ नफा ५ कोटी ८८ लाख झाला असून, सर्व तरतुदी वगळता १ कोटी २८ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना १५०० रुपयांची पगारवाढ केली असून, त्यांना विविध प्रकारच्या विमा योजनांचीही सोय केली आहे.

उपाध्यक्ष बाबाजी नाईक, संचालक जयवंत शिंपी, महादेव टोपले, रणजित देसाई, विजय देसाई, सहदेव नेवगे, महादेव पोवार, जोतिबा चाळके, सुनील डोणकर, रेखा देसाई, वृषाली कोंडुस्कर, शामराव चौगुले, के. जी. पटेकर, एस. एम. अस्वले, संदीप कांबळे, पी. ए. सरंबळे, एम. वाय. सावंत, एस. एच. चौगुले उपस्थित होते.

फोटो कॅप्शन - आजऱ्यातील जनता बँकेच्या ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष मुकुंद देसाई. शेजारी उपाध्यक्ष बाबाजी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील.

Web Title: Janata Bank in Ajmer will cross the 300 crore deposit mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.