कोडोली येथे जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:59+5:302020-12-05T05:00:59+5:30

कोडोली : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांची विधानपरिषदेवर निवड झालेने कोडोलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ...

Jallosh at Kodoli | कोडोली येथे जल्लोष

कोडोली येथे जल्लोष

कोडोली : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांची विधानपरिषदेवर निवड झालेने कोडोलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटत विजय उत्सव साजरा केला.

कोडोली येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव व केडीसी बँकेचे संचालक बाबासाहेब आसुर्लेकर व गौतम कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून फटाक्याची आतषबाजी करत साखर-पेढे वाटण्यात आले. यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे, मालेचे सरपंच उत्तम पाटील, सातवेचे उपसरपंच माणिक पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, वीरेंद्र पाटील, कोडोली शिवसेना अध्यक्ष शैलेश पिसाळ, उपाध्यक्ष अंकुश रोकडे, अजित पाटील, संजय निकम, नितीन माने, अभिजित बनसोडे, पंकज कापरे, पृथ्वीराज पाटील, संजय राबाडे, सुनील पाटील उपस्थित होते.

Web Title: Jallosh at Kodoli